Database काय आहे? Database Meaning in Marathi

तुम्हाला माहिती आहे का Database काय असतो? (What is Database in Marathi) किंवा डेटाबेस चे प्रकार कोण-कोणते असतात. तसेच डाटाबेस चा वापर आपण का व कश्यासाठी करतो. मित्रांनो, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की जगामध्ये आजच्या काळात सर्वात जास्त मागणी कशाची असेल तर ते म्हणजे डाटा आणि माहिती. डेटाबेस हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो. या पोस्ट मधून आम्ही तुम्हाला Database बद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहोत तरि विनंती आहे की आमची ही पोस्ट शेवटपर्यंत वाचावी.

Database काय आहे?

डेटाबेस (DB), हे माहितीचे भांडार समजल्या जाते, जिथे एखादी माहिती सुरक्षित आणि व्यवस्थित ठेवली जाते. ऑर्गनायझ्ड म्हणजे जशी एखादी गोष्ट आपण टेबलावर ठेवतो, त्याच पद्धतीने माहिती आणि डेटा डेटाबेसमध्ये ठेवल्या जातो. माहिती संग्रहित करण्यासाठी, काही सॉफ्टवेअर वापरले जातात, सर्वोत्तम उदाहरण MS-Excel आहे. येथे सर्व डेटा हार्ड डिस्क सारख्या डिजिटल मेमरी उपकरणांमध्ये ठेवला जातो.

माहिती डेटाबेसमध्ये अशा प्रकारे ठेवली जाते की आपण डेटामध्ये सहजपणे प्रवेश करू शकता आणि त्या माहिती ला हाताळू शकता.

उदाहरणासह समजून घेऊया “MS-Excel शीट जिथे तुमच्याकडे १०० विद्यार्थ्यांचे तपशील आहेत. रोल क्रमांक, नाव, पत्ता, शहराचे नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख या सारख्या गोष्टी आहेत. येथे आपण असे म्हणू शकतो की ही एक्सेल शीट एक डेटाबेस आहे. कारण आपण या एक्सेल शीट ला केव्हाही हाताळू शकतो आणि आपल्याला हवी ती माहिती अगदी सेकंदात मिळवू शकतो. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास माहितीचे भंडार म्हणजेच डेटाबेस होय.

DB म्हणजे डाटाबेसमध्ये जी काही माहिती आणि डेटा आहे, तो तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही त्यात प्रवेश करू शकता. आता Access म्हणजे काय ते समजून घेऊ. एक युनिव्हर्सिटी आहे, जिथे बरेच विद्यार्थी आहेत.

आता त्यांचे निकाल संगणकाद्वारे डेटाबेसवर अपलोड केले जातात, विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटवर देखील असू शकते. त्यामुळे ते तिथेही अपलोड केले आहे. आता तो विद्यार्थ्यांच्या निकालाचा डेटाबेस बनला आहे.

निकालाची तारीख आल्यावर हा निकाल जाहीर केला जातो. त्यानंतरच विद्यार्थी आपला रोल नंबर टाकून निकाल शोधू लागतात. या प्रक्रियेला डेटाबेसमध्ये प्रवेश करणे म्हणतात.

गुगलचे, कंपनीचे, सरकारचे डेटाबेस असे अनेक डेटाबेस आहेत, जिथे ते त्यांची माहिती साठवतात आणि हवे असेल तेव्हा ती पाहू शकतात.

Database Management System (DBMS)

ही एक सॉफ्टवेअर प्रणाली आहे, ज्याद्वारे वापरकर्ता डेटाबेस तयार करतो, परिभाषित करतो, देखरेख करतो आणि नियंत्रित करतो. डीबीएमएस हा प्रोग्रामचा संग्रह आहे आणि सामान्यत: डेटाबेस (डीबी) राखण्यासाठी वापरला जातो.

आता Maintain चा अर्थ समजून घेऊया, “यामध्ये तुम्ही DB मध्ये डेटा टाकणे, Edit, Delete, Access आणि Update या सर्व गोष्टी करू शकता.

डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम (DBMS) म्हणजे काय हे तुम्हाला आधीच माहीत आहे. आपण पुन्हा समजून घेऊ, DBMS हे एक सॉफ्टवेअर पॅकेज आहे. या सॉफ्टवेअरद्वारे तुम्ही डेटाबेस तयार करू शकता. जसे तुम्ही स्टुडंट नावाचा डेटाबेस तयार केला आहे, आता तुम्हाला त्यात विद्यार्थ्यांचे तपशील जोडावे लागतील.

जाणूनबुजून किंवा नकळत चुकीचा डेटा दिल्यास, तुम्हाला विद्यार्थ्यांचे तपशील संपादित करावे लागतील. काही दिवसांनी तुम्हाला कळले की एखाद्याचा डेटा चुकीचा आहे, मग तुम्हाला तोही डिलीट करावा लागेल. जर तुम्हाला एखाद्या विद्यार्थ्याच्या रोल नंबरवरून त्याचे नाव आणि पत्ता शोधायचा असेल तर त्याला डेटाबेस मध्ये प्रवेश म्हणतात. आणि यालाच डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम किंवा DBMS देखील म्हणतात.

DATABASE Operations

डेटाबेस तयार करतांना तुम्हाला खूप काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. त्यापैकि काही पर्याय आम्ही खाली संगितले आहेत.

1)Insert

डेटाबेस मध्ये इन्सर्ट करणे म्हणजेच नवीन माहिती जोडणे असा याचा अर्थ होतो. तुम्हाला जर नवीन माहितीची जोडणी कराची असेल तर तुम्ही इन्सर्ट ऑप्शन चा वापर करू शकता.

2) Delete

डेटाबेस मध्ये एखादी माहिती चुकीची टाकली गेली असल्यास. तुम्हाला ती डिलीट करावी लागेल नाहीतर ती चुकीची माहिती समोरच पाहणारा व्यक्ति बरोबर समजेल त्यासाठी तुम्हाला डिलीट या पर्यायचा वापर करावा लागेल आणि ती चुकीची माहिती डिलीट करावी लागेल.

Leave a Comment